Water Crisis: मॉन्सूनच्या विलंबामुळे टंचाईच्या झळा बळावल्या; राज्यात 66 गावे अन 119 वाड्यांसाठी 31 टँकरची वाढ!

water crisis
water crisisesakal

Water Crisis : मॉन्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्याने राज्यातील टंचाईच्या झळा बळावल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ६६ गावे आणि ११९ वाड्यांना पिण्याच्या पाणीपुरवठा करण्यासाठी ३१ टँकरची वाढ प्रशासनाला करावी लागली आहे.

सध्यस्थितीत ५३५ गावे आणि १ हजार २४६ वाड्यांसाठी ३८१ टँकर धावताहेत. (Monsoon delay exacerbates scarcity increase of 31 tankers for 66 villages and 119 mansions in state nashik news)

गेल्यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात ५७२ गावे आणि १ हजार २८२ वाड्यांसाठी ४८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. गेल्या आठवड्यात ४६९ गावे आणि १ हजार १२७ गावांना ३५० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता.

विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यापर्यंत सोलापूर जिल्ह्यात एकही टँकर गेल्यावर्षीप्रमाणे सुरु नव्हता. या आठवड्यात मात्र सोलापूर जिल्ह्यातील ३ गावे आणि २० वाड्यांसाठी ३ टँकर सुरु करण्यात आले आहेत.

अद्याप सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात एकही टँकर सुरु नाही. गेल्यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात धुळे, नंदूरबार, औरंगाबाद, बीड, परभणी या जिल्ह्यात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासनाला करावा लागला होता.

टँकर वाढलेले जिल्हे

रत्नागिरीमध्ये २, पालघरमध्ये ४, नाशिकमध्ये २, जळगावमध्ये २, नगरमध्ये १, पुण्यात ३, सातारामध्ये ६, सोलापूरमध्ये ३, अमरावतीमध्ये ७, बुलढाणामध्ये १ टँकरद्वारे अधिकचा गेल्या आठवड्याच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water crisis
NMC News: 40 वर्षानंतर महापालिकेची सेवा व प्रवेश नियमावली मंजूर; रिक्तपदे भरण्याचा मार्ग मोकळा

सध्यस्थितीत जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून (कंसात जिल्ह्यातील गावे आणि वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या दर्शवते) : ठाणे-६७-१९९ (४४), रायगड-७४-२८८ (४६), रत्नागिरी-१०५-१९५ (१८), पालघर-२८-९१ (३८), नाशिक-६६-५१ (५७),

जळगाव-२२-० (२५), नगर-२१-९५ (१४), पुणे-५०-२१४ (३७), सातारा-२२-७१ (२१), सांगली-१-७ (१), सोलापूर-३-२० (३), कोल्हापूर-१-२ (१), जालना-२१-१२ (२५), हिंगोली-१०-० (१२), नांदेड-३-० (४), अमरावती-१९-० (१२), वाशीम-१-० (१), बुलडाणा-१७-० (१८), यवतमाळ-४-० (४). गेल्यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग,

कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू नव्हता. मात्र नागपूर जिल्ह्यातील ५ गावांसाठी ७ टँकर सुरु होते.

विभागनिहाय टँकरची स्थिती

विभागाचे नाव आजचा पाणीपुरवठा मागील आठवड्यातील पाणीपुरवठा ७ जून २०२२ चा पाणीपुरवठा

गावे वाड्या टँकर गावे वाड्या टँकर गावे वाड्या टँकर

कोकण २७४ ७७३ १४६ २६८ ७१६ १४० २०३ ६२२ ११४

नाशिक ८९ १४७ ९६ ८१ १३७ ९१ १३९ २८३ ११८

पुणे ७७ ३१४ ६३ ६३ २६२ ५१ ७७ ३४० ७९

औरंगाबाद ३४ १२ ४१ ३२ १२ ४१ ६४ ३७ ८७

अमरावती ४१ ० ३५ २५ ० २७ ८४ ० ८२

नागपूर ० ० ० ० ० ० ५ ० ७

water crisis
Nashik ZP News: स्वयंसेवी संस्थांसाठी खुली झाली जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची दालने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com