Unauthorized Banners
sakal
नाशिक: दिशादर्शक, माहितीदर्शक फलकांवर सर्रास भाऊ, दादांच्या वाढदिवसाचे, निवड शुभेच्छांचे संदेश झळकत होते. परंतु गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईतच महापालिका प्रशासनातर्फे अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. बहुतांश शहरभरात भाऊ, दादांचे बॅनर उतरविण्यात आल्याने चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.