Nashik News : मनपाने ‘जिंदाल’ कडे मागितले 5 लाख 66 हजारांचे बिल

Jindal Fire Accident
Jindal Fire Accident esakal

नाशिक : मुंढेगाव (ता. इगतपुरी) शिवारातील जिंदाल पॉलिफिल्मस कंपनीला लागलेली आग विझविण्यासाठी महापालिकेतर्फे अकरा बंब पाठविण्यात आले होते. त्यापोटी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने जिदाल कंपनीच्या व्यवस्थापनाकडे पाच लाख ६६ हजार रुपयांचे शुल्क अदा करण्याचे मागणीपत्र पाठवले आहे.

मुंडेगाव येथील औद्योगिक वसाहतीतील जिंदाल कंपनीला १ जानेवारीला आग लागली होती. आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. जवळपास २४ तासांहून अधिक काळ आग कायम होती. (Municipal asked for Jindal Company Bill of five lakh Sixty Six thousand Jalgaon News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

Jindal Fire Accident
Nashik News : महा-ई-सेवा केंद्राचा परवाना वर्षासाठी रद्द

तब्बल चार दिवस महापालिकेने आग विझवण्यासाठी बंब पाठवले. भिवंडी, इगतपुरी, सिन्नर पालिकेचे अग्निशमन बंबदेखील आग विजण्यासाठी दाखल झाले. नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आग विझविण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली.

सहा अग्निशमन बंब, एक ब्राउझर व ३२ मीटर उंचीपर्यंत जाऊ शकणाऱ्या अग्निशमन शिडीच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविले. केमिकलवरील आग विझविण्यासाठी फोमचा वापर करण्यात आला.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी महापालिकेला पाच लाख ६६ हजार ३६८ रुपयांचे अग्निशमन शुल्क कंपनीने अदा करावे तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चापोटी १६ हजार ५७६ रुपयांचे देयके जिंदाल कंपनीच्या व्यवस्थापनाकडे महापालिकेने पाठविले, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली.

Jindal Fire Accident
Nashik News | ज्ञानदीपमधील अत्याचार प्रकरणी आयोगाला स्वतंत्र अहवाल देणार : सेवानिवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com