Municipal Budget
sakal
नाशिक: महापालिकेकडून २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या व मार्चअखेर शिल्लक राहणारा व बचत झालेला निधी आमदारांसह वजनदार नगरसेवकांची कामे व पीपीपी-हॅम तत्त्वावर सुरू असलेल्या प्रकल्पांवर खर्च करण्यासाठी पुनर्विलीनीकरणाच्या नावाखाली वळविण्यात आला आहे. महासभेत ठरावाच्या माध्यमातून यावर शिक्कामोर्तब झाले असून, आर्थिक वर्षाच्या सुरवातीला ज्या हेडखाली निधीची तरतूद करण्यात आली होती, तो निधी आता पूर्णपणे खर्च न होता अन्यत्र वळविला आहे.