esakal | महापालिकेचा पुन्हा दंडात्मक कारवाईचा निर्णय | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

nashik-municipal-corporation

महापालिकेचा पुन्हा दंडात्मक कारवाईचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात कोरोना दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुन्हा दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क न वापरणाऱ्या दुकानांची व बाजारपेठेमध्ये सार्वजनिक ठिकाणांची तपासणी केली जाणार आहे.

गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात शहरात कोरोना पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णांची संख्या वाढत गेली. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची पहिली लाट पूर्णपणे ओसरली. त्यानंतर मात्र या वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस पासून दुसऱ्या लाटेला सुरवात झाली. मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. अडीच लाखांहून अधिक रुग्ण शहरांमध्ये आढळले. कोरोना लाट थांबवायची असेल तर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पाळणे पालन करणे गरजेचे आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे व सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहेत. मात्र, बाजारपेठेमध्ये नागरिकांकडून सर्रास या नियमांचे उल्लंघन होत आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळे खुली झाल्याने नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत.

मात्र, कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन होत नसल्याची बाब आढळून आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न राखणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विभागीय स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षकांमार्फत खासगी आस्थापनाची तपासणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

loading image
go to top