Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिका कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीची दखल घेत दिवाळीसाठी पालिका प्रशासनाकडून २३ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. महापालिका कर्मचारी, अंगणवाडीसेविका व मदतनीस, रोजंदारी व मानधनावरील कर्मचारी, सफाई कर्मचारी, बूस्टर पंपिंग कर्मचारी व शिक्षण विभागातील अशा सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान मिळणार आहे.