Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले. ३१ प्रभागांत १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी एक हजार ५६३ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली. एकूण मतदान केंद्रांपैकी २६६ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी आठ हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान करता येणार आहे.