Nashik Traffic Problem : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयआयटी पवईकडे पत्रव्यवहार

Nashik Traffic Problem : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयआयटी पवईकडे पत्रव्यवहार

Nashik Traffic Problem : मुंबई नाका सर्कल परिसरात दररोज संध्याकाळी पाच ते रात्री आठपर्यंत होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने आयआयटी पवईला पत्र पाठविले आहे. (Municipal Corporation has sent letter to IIT Powai on issue of traffic jam nashik news)

त्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्याय सुचविण्याची विनंती केली आहे. शहरात मुंबई नाका, एबीबी सर्कल, सिटी सेंटर मॉल सर्कल, सीबीएस अशोकस्तंभ, फेम सिनेमा सिग्नल, द्वारका भागामध्ये सातत्याने वाहतूक ठप्प होते.

मुंबई नाका सर्कल येथे दररोज संध्याकाळी पाच ते रात्री आठदरम्यान वाहतूक ठप्प होत असल्याने त्याचा परिणाम शहरातील अन्य वाहतुकीवर होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Traffic Problem : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयआयटी पवईकडे पत्रव्यवहार
Nashik News : दीड वर्षाच्या गार्गीने रचला अनोखा विक्रम!

त्यामुळे वाहतूक सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये मुंबई नाका येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाय सुचविले.

त्यात अंडरपास करणे, सिग्नल यंत्रणा बसविणे या पर्यायांचा अवलंब करण्याच्या अनुषंगाने आयआयटी पवईकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आयआयटी पवईकडे मुंबई नाका सर्कल येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाय सुचवावे, अशी विनंती पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Nashik Traffic Problem : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयआयटी पवईकडे पत्रव्यवहार
Nashik Ganeshotsav News : गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक मार्गात बदल; 'या' पर्यायी मार्गांचा करा अवलंब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com