esakal | नाशिक मनपाचा भाजपला न्याय अन् राष्ट्रवादीवर अन्याय? झुकते माप दिल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

नाशिक महापालिकेचा भाजपला न्याय अन् राष्ट्रवादीवर अन्याय?

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : सत्तेत असलेल्या पक्षाला महापालिकेने झुकते माप दिले का, हा खरा प्रश्‍न आहे. महापालिकेने फलकांबद्दल भाजपला (BJP) न्याय दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) अन्याय केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय?

सत्तेत असलेल्या पक्षाला महापालिकेकडून झुकते माप?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील हे नाशिक दौऱ्यावर असताना शहराचे विद्रूपीकरण होऊ नये म्हणून पक्षातर्फे फलक लावण्यात आले नाहीत. राष्ट्रवादी भवन कार्यालयाच्या आवारात स्वागत फलक लावले होते. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हे फलक हटविले. कार्यकर्त्यांनी शांततेची भूमिका घेत फलक काढले, असे सांगून खैरे म्हणाले, की महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या स्वागताचे फलक त्यांच्या आमदारांनी शहरात लावले. त्याविरुद्ध महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. तसेच लावलेले फलक हटविले नाही. त्यावरुन सत्तेत असलेल्या पक्षाला महापालिकेने झुकते माप दिले का, हा खरा प्रश्‍न आहे. शिवाय आणखी एका आमदारांनी लावलेल्या फलकासंबंधी परवानगी घेत फलकावर परवानगी क्रमांक टाकले आहेत.

हेही वाचा: नितीन गडकरींचे नाशिक, ठाणेकरांना गिफ्ट! वाहनधारकांना दिलासा

आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक उड्डाणपुलाच्या उद्‌घाटनानिमित्त केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी शहरात लावण्यात आलेल्या फलकांबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेने फलकांबद्दल भाजपला न्याय दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, अनधिकृत फलक लावल्याबद्दल आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा: गजबजलेल्या शाळेत प्रार्थनेचे सूर ऐकताच पाणावले शिक्षकांचे डोळे

loading image
go to top