esakal | गजबजलेल्या शाळेत प्रार्थनेचे सूर ऐकताच पाणावले शिक्षकांचे डोळे | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

School

गजबजलेल्या शाळेत प्रार्थनेचे सूर ऐकताच पाणावले शिक्षकांचे डोळे

sakal_logo
By
घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

दाभाडी (जि. नाशिक) : तब्बल दीड वर्षाच्या दीर्घ घोषित ‘थांब्या’नंतर शाळांची घंटा वाजली. ऑनलाइनने अवघे शैक्षणिक क्षेत्र ग्रासले असताना नव्या उमेदीने शाळा सुरू झाल्या. बालकांचा किलबिलाट, चेहरा खुलल्याचे चित्र बघावयास मिळाले. प्रार्थनेचे सूर कानी पडताच शिक्षकांचे डोळे पाणावले. एका भावनिक नात्याची आगळी गुंफण शाळा परिघात बघावयास मिळाली.


शासनाने शाळा सुरू केल्याचे जाहीर करताच बालकांच्या स्वागतास शाळा सज्ज झाल्यात. दीड वर्षांनी शाळेच्या प्रांगणात दाखल झालेली सर्वच वर्गातील मुलं काहीशी कावरीबावरी झालीत. आपल्या लेकरांना सोबत घेऊन आलेला पालकवर्ग भीतीच्या दडपणाखाली अन् पाल्याच्या भविष्याच्या चिंतेचा छटा चेहऱ्यावर उमटलेल्या होत्या. शाळेची घंटा वाजताच मुले पुन्हा शाळेच्या विश्वात स्थिरस्थावर झाली. पहिल्याच दिवशी प्रार्थनेचे सूर काहीशा दबक्या आवाजात गायली खरी; परंतु हे सूर ऐकताच शिक्षकांचे डोळे पाणावले.


वर्गात मुलं-मुली ऑनलाइनच्या नानातऱ्हेच्या अडचणी सांगत सुटले. ऑनलाइनचे भन्नाट किस्से सांगत मुलं हातावर टाळी घेत झाली. तर ग्रामीण भागात ऑनलाइन किती अडचणीचे अन् दुरापास्त होते, हे गरीब घरातील मुलांच्या प्रतिक्रियांवरून उलगडत होते. या सर्व उत्साही वातावरणात ‘शाळा पुन्हा भेटली’ याचा वेगळा आनंद मुला-मुलींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. एका नव्या साक्षात्काराचा शैक्षणिक परिघात बघावयास मिळाला. मात्र काही पालक अद्यापही भीतीच्या दडपणाखाली आहेत. सामाजिक स्तरावर भीती दूर करण्याचे आव्हान शाळांपुढे आहे. शाळाशाळांत नवा उत्साह अन् भिरभिरती पाखरं बघून शाळेच्या सुन्या भिंती बोलक्या झाल्या.

हेही वाचा: नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर आणणार; नितीन गडकरींचे आश्वासनमुलांचं भावविश्व अनुभवने हा नवा आविष्कार होता. कोरोनाने मुलांसह सर्वांच्या वाटेला कटू अनुभव दिले. त्या संकटाला मागे सारत नवी पहाट अनुभवायला मिळाली.
- दिगंबर नारायणे,
शिक्षक नेते, येवला


ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन शिक्षणच प्रभावी आहे. शाळेच्या ओढीने मुलं शाळेत मोठ्या उत्साहात रमली. एक सळसळता संचार मुलांच्या देहबोलीतून दिसला.
- आर. डी. पवार,
मुख्याध्यापक, एसएसए नूतन इंग्लिश स्कूल, ब्राह्मणगाव, ता. बागलाण


हेही वाचा: नाशिक : लसीकरणासाठी सुरवातीला बोंबाबोंब, आता केंद्रे ओस

loading image
go to top