Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिकसाठी महापौर व उपमहापौरपदासाठी येत्या ६ फेब्रुवारीला निवडणूक होत असून, त्याच दिवशी स्थायी समितीच्या सदस्यांचीही नियुक्ती होणार आहे. पहिली महासभा महापौर निवडीची झाल्यानंतर लगेचच दुसरी सभा नवनियुक्त महापौरांच्या अध्यक्षतेखाली होऊन स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याने स्थायी समिती सदस्यत्वासाठी फिल्डिंग लागली आहे.