Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा! कुंभमेळ्यासाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल
Nashik Municipal Corporation Approves Recruitment : टिसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) सोबत झालेल्या करारानुसार या कंपनी मार्फत भरती केली जाणार आहे. दिवाळीनंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल अशी माहिती प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.
नाशिक: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करत महापालिकेत पदांची भरती करण्यास परवानगी दिल्यानंतर प्रशासनाच्या वतीने रिक्त पदांची भरती करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.