Eknath Shinde
sakal
नाशिक: महापालिकेत भाजपसोबत सत्तेत बसताना शिवसेनेतील अंतर्गत वादाने टोक गाठल्यानंतर त्यातून सुरू झालेल्या नाराजीनाट्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर तूर्त पडदा पडला आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या धर्तीवर उपमहापौरपद सव्वा वर्ष, तर गटनेतेपद एक वर्षासाठी दिले जाणार असल्याची माहिती पक्षाचे संपर्कनेते राम रेपाळे यांनी दिली. परंतु अंतिम निर्णय मुख्य नेते शिंदे हेच घेणार असल्याची पुस्ती जोडली.