Nashik Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग, नाशिक पालिका प्रभागरचनेवर हरकती दाखल
Draft Ward Structure of Nashik Municipal Councils Declared : नाशिक जिल्ह्यातील ११ पालिकांच्या प्रारूप प्रभागरचनेवर आतापर्यंत १० हरकती दाखल झाल्या असून, मनमाड शहरातून सर्वाधिक आक्षेप नोंदवले गेले आहेत.
नाशिक: जिल्ह्यातील पालिकांच्या प्रारूप प्रभागरचनेवर आतापर्यंत १० हरकती दाखल झाल्या असून, मनमाड शहरातून सर्वाधिक पाच हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांना प्रभागरचनेवरील हरकती व सूचना रविवार (ता.३१) पर्यंत नोंदविता येणार आहेत.