नाशिक - आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने बहुसदस्यीय प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर आता प्रभागरचना हद्द निश्चितीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रभागरचना अंतिम केल्यानंतर आरक्षण, मतदारयादी अंतिम करण्याच्या प्रशासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली असून, त्यानंतर निवडणुकांची तारीख घोषित होईल. प्रशासकीय कार्यक्रमाची आखणी लक्षात घेता डिसेंबर २०२५ अखेर किंवा जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर होतील अशी माहिती सूत्रांनी दिली.