Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या जवळपास अकरा हजार कर्मचाऱ्यांपैकी दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाला ४०० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली आहे. प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.