Municipal Election
sakal
नाशिक: भाजपच्या धक्कातंत्रामुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी डॅमेज कंट्रोल नाशिकमध्ये धाव घेतली. खासदार अनिल देसाई यांनी शुक्रवारी (ता.२६) पक्षाची बंद दाराआड बैठक घेतली. या वेळी देसाई यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर नाराजी व्यक्त करताना पक्षाची निष्ठावान साखळी मजबूत करून कामाला लागावे, अशा सूचना त्यांनी केल्या.