Municipal Election
sakal
नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीत युती होईल की आघाडी, याबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये अद्याप अनिश्चिती आहे. त्यामुळे सार्वजनिकरीत्या केलेले वक्तव्य व प्रत्यक्षात आखली जाणारी रणनीती या दोहोंत फरक दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे, तर काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यास सपशेल नकार देताना स्वतंत्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.