Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत युती होईल की नाही, याबाबत असलेला संभ्रम आता दूर झाला आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन व शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यात प्राथमिक चर्चा पार पडल्यानंतर युतीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र, जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झाले नसून, येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने शिवसेनेला ३२ जागा सोडण्याची तयारी केली असली, तरी शिवसेनेकडून मात्र ४५ जागा मिळविण्याचा प्रयत्न राहील.