Municipal Election
sakal
नाशिक: महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमताने सत्ता मिळाली. सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्ता मिळविण्यासाठी तेवढी आकडेवारी आपल्याजवळ आहे. त्यामुळे स्वबळावर महापालिकेची निवडणूक लढविण्याची एकमुखी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.