Municipal Election
sakal
नाशिक: जिल्ह्यातील पालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत रविवार (ता. २३) हा प्रचाराचा मेगा दिवस ठरला. उमेदवार व त्यांच्या सर्मथकांनी सुटीचा मुहूर्त साधत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. उमेदवारांनी प्रभाग व शहराच्या विकासाचा लेखाजोखा मांडताना नागरिकांकडे मतदानाचा जोगवा मागितला. दरम्यान, अद्याप चिन्ह मिळालेले नसले तरी अपक्षांनीही लक्ष राहू द्या, चिन्हांचे लवकरच सांगू, अशी आळवणी करीत प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली.