Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने व २३ डिसेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. भाजपने मुलाखतींचा ‘जम्बो’ टप्पा पार केला. जवळपास ५०० मुलाखती बुधवारी (ता. १७) झाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जवळपास २०० इच्छुकांची मुलाखत झाल्या. दिवसभर मुलाखतीच्या प्रक्रियेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. इच्छुकांची गर्दी लक्षात घेता, मुलाखत घेणाऱ्यांच्या तीन टीम तयार करण्यात आल्या.