Municipal Election
sakal
जुने नाशिक: महापालिका पंचवार्षिक निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होताच, पश्चिम विभागाच्या अतिक्रमण पथकाकडून राजकीय फलक आणि झेंड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. विभागातील विविध भागांतील रस्त्यांवर, वाहतूक बेटांवर तसेच कमानींवर असलेले झेंडे आणि फलकांचा यात समावेश आहे. सुमारे एक ट्रक साहित्य काढण्यात आले. त्यामुळे रस्ते आणि चौकांनी मोकळा श्वास घेतला.