Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी आघाडी, युतीबाबत बोलणी सुरू असताना दोन्हीकडे जागा वाटपावरून सर्वच पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे चित्र आहे. मनसेला आघाडीत घेतले तरी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वाटेला जितक्या जागा येतील त्यातून जागा द्याव्यात, अशी ताठर भूमिका काँग्रेसने घेतली आहे. ठाकरे सेनेकडून काँग्रेस सोबत आली तर ठीक अन्यथा काँग्रेस सोडून आघाडी निवडणूक लढवेल, अशी भूमिका घेण्यात आली आहे.