Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी महायुती होणार की घटक पक्ष स्वतंत्र लढणार हा मुद्दा जवळपास संपुष्टात आला असून, नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षांच्या वरिष्ठांच्या चर्चेअंती महायुती होणार असल्याचे स्थानिक पातळीवर सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवले जाणार, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. परंतु, भाजप-शिवसेना महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात अवघ्या २२ जागा शिवसेनेला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.