Mahayuti campaign
sakal
नाशिक: पालिका निवडणुकीत महायुतीच्या प्रचाराचा नारळ सोमवारी (ता. २४) फुटणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा दुपारी साडेबाराला त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यातील पहिली सभा नांदगावला होत आहे. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकाच दिवशी जिल्ह्यात येत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघेल.