Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकचे राजकारण निर्णायक वळणावर आले आहे. भाजप व शिवसेनेत उमेदवारीसाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी असतानाच, मुंबईत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या चर्चेनुसार नाशिक महापालिकेत भाजपला ८०, शिवसेनेला ३५, राष्ट्रवादीला पाच तर रिपब्लिकन पक्षाला दोन जागा देण्याचा प्राथमिक आराखडा तयार झाल्याचे बोलले जात आहे. या संभाव्य फॉर्म्युल्यामुळे महायुतीतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली असून बंडखोरीचा धोका स्पष्टपणे जाणवू लागला आहे.