मालेगाव शहर: मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणाऱ्या शाईऐवजी सुमारे दीड हजार मार्कर पेन वापरण्यात येणार आहेत..शहरात जवळपास ६०९ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, प्रत्येक केंद्रावर दोन मार्कर पेन देण्यात येणार आहेत. यासोबतच १० टक्के मार्कर राखीव ठेवण्यात येणार असल्याने एकूण अंदाजे १,५०० मार्करची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत आवश्यक साहित्य संकलनाची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. .मतदान केल्यानंतर प्रत्येक मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर निळ्या रंगाची शाई लावण्यात येत होती.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल तंत्रज्ञानाच्या काळात मतदानाच्या प्रक्रियेत मतदान केंद्रावर गेल्यावर एक वेगळा बदल पाहायला मिळणार आहे..आतापर्यंत बाटलीतील शाईत काडी बुडवून बोटावर लावली जाणारी पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा झाली असून, त्याऐवजी आधुनिक ‘मार्कर पेन’चा वापर केला जाणार आहे.निवडणूक आयोगाने या प्रक्रियेसाठी शहरात एक हजार पाचशे विशेष मार्कर पेन दिले आहेत. कर्नाटकच्या म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेडकडून तयार करण्यात आलेले हे पेन दोन देण्यात येणार आहेत..Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!.मार्कर पेनच्या शाईमध्ये ‘सिल्व्हर नायट्रेट’ हा मुख्य घटक आहे. जेव्हा या पेनने बोटावर रेघ ओढली जाते, तेव्हा त्वचेतील प्रथिनांशी त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन ‘सिल्व्हर क्लोराईड’ तयार होते. परिणामी, ही शाई पाण्याने कितीही धुतली तरी निघत नाही. यापूर्वी नगर परिषदेच्या निवडणुकीत या प्रकारच्या मार्कर पेनचा वापर करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीत मार्कर पेनने मतदारांच्या बोटावर रेघ मारण्यात येईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.