Municipal Election
sakal
नाशिक: राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केल्यानंतर महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली. सायंकाळपासून शहरात आचारसंहिता लागू झाल्यानंतर आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खत्री यांनी नियंत्रणासाठी दहा अधिकारी व ३० सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. दरम्यान, मंगळवारी (ता. १६) तातडीची बैठक बोलाविली आहे.