Municipal Election
sakal
जुने नाशिक: निवडणूक उमेदवारी अर्ज अतिशय बारकाईने भरणे आवश्यक असतो. एका चुकीने अर्ज बाद होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी इच्छुक उमेदवारांकडून जाणकार व्यक्तीकडून विशेषता वकील मंडळींकडून अर्ज भरून घेतला जातो. मंगळवारी (ता. २३) महापालिका निवडणुकीनिमित्त उमेदवारी अर्ज उपलब्ध झाल्याने सकाळपासूनच अर्ज भरून देणाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज भरून घेणाऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली.