Nashik Municipal Elections
sakal
नाशिक: चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला मंगळवार (ता. २३) पासून सुरवात होत आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ३१ प्रभागांसाठी दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र कार्यालयांची निर्मिती व त्या कार्यालयांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.