Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर प्रभागनिहाय आरक्षण पडल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणूक तयारीने जोर पकडला आहे. त्यामुळे राजकीय पक्षदेखील सतर्क होताना दिसत आहे. सत्ताधारी भाजपमध्ये इनकमिंगचा आकडा मोजला जात आहे. शिवसेनेकडून ताकदीने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्याबरोबरच प्रचारासाठी ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे.