Nashik Municipal Election Result 2025
Sakal
नाशिक: जिल्ह्यातील ११ पालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष- शिवसेनेलाच नागरिकांनी पसंती दिली असून, महाविकास आघाडीचा पुरता फज्जा उडाला आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच नगराध्यपदे मिळवत शिवसेनेने मुसंडी मारली असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन ठिकाणी नगराध्यक्षपदावर संधी मिळाली आहे. पिंपळगाव बसवंत आणि ओझर येथील सत्ता प्रथमच भाजपला मिळाली.