Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी महायुती संदर्भात अद्याप अनिश्चितता असताना भाजपच्या ‘एक ला चलो‘ रे च्या संकेतातून शिवसेनेने देखील स्वबळ अजमावण्याची तयारी सुरु केली आहे. निवडणुकीसाठी वॉररुम बरोबरच निवडून येणाऱ्या जागा अधिक भक्कम करताना मागील निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या उमेदवारांची चाचपणी सेनेकडून केली जात आहे. पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यात स्पष्ट सूचना मिळाल्यानंतर निवडणूक कामाची गती अधिक वाढविली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.