Shiv Sena UBT–MNS
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर सारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रित आले आहेत. पण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शहरातील ३१ पैकी नऊ प्रभागांमध्ये मनसेविरोधात उमेदवार उभे केले. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युतीत बिघाडी निर्माण झाली आहे.