नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. २२) रात्री उशिरा प्रभागांच्या हद्दीचा नकाशा प्रसिद्ध केला. प्रभागांची हद्द निश्चित करताना २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. आरक्षण मात्र राज्य शासनाच्या सूचनेनुसारच काढले जाणार असून, त्यातही २०१७ मधील आरक्षणच कायम राहील अशी माहिती सूत्रांनी दिली. निवडणुकीत मतदान करताना मात्र २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीची मतदारयादी ग्राह्य धरली जाणार असल्याची माहिती प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.