Municipal Election
sakal
मालेगाव: महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होत आहे. निवडणुकीत २१ प्रभागातून ८४ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी प्रशासनाने मंगळवारी (ता. ११) आरक्षण सोडत जाहीर केली. ८४ पैकी ४२ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी २, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी २२ तर सर्वसाधारण ५६ जागा आहेत. आरक्षण जाहीर झाल्याने इच्छूकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.