Municipal Election
sakal
नाशिक: जिल्ह्यातील ११ पालिकांमध्ये शुक्रवारी (ता. २१) अंतिम माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार रिंगणात असून, नगरसेवकांच्या २६६ जागांसाठी एक हजार २८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. बहुतांश ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती रंगणार असून, काही प्रभागांत बहुरंगी लढती होणार आहेत. पुढील दहा दिवस आरोप-प्रत्यारोप रंगणार असल्याने मतदारांचे राजकीय मनोरंजन होईल.