Municipal Election
sakal
नाशिक: जिल्ह्यात नगरपरिषदांच्या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील मित्रपक्षातच संघर्ष रंगला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील या संघर्षात पाच नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आणत शिवसेनेने क्रमांक एकची जागा राखली. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप राहिले. ११ नगरपरिषदांमध्ये काँग्रेस आघाडीला मात्र एकाही जागेवर मित्रपक्षांतील संघर्षाचा लाभ मिळविता आला नाही. परिणामी, जिल्ह्यात महायुतीची आणि महायुतीत शिवसेनेची हवा राहिली.