Election
sakal
नाशिक: जिल्ह्यातील ११ पालिकांसाठी मंगळवारी (ता. २) निवडणुका पार पडत आहेत. यातील नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले असून, भविष्य आजमावत आहेत. पक्षीय उमेदवारांबरोबरच अपक्षांनी रिंगणात उडी घेतल्याने मतविभागणी मोठ्या प्रमाणात होणार असून, त्याचा लाभ कोणाच्या पारड्यात पडतो, यावर यशापयशाची गणिते विसंबून आहेत. चांदवडमध्ये सर्वाधिक दहा, त्र्यंबकेश्वर व मनमाडमध्ये प्रत्येकी आठ, ओझरमध्ये सात उमेदवार मतदारांना सामोरे जात आहेत; तर सिन्नर व इगतपुरीत चौरंगी, सटाणा व पिंपळगावमध्ये तिरंगी; तर नांदगाव, भगूर व येवल्यात थेट लढत होत आहे.