Municipal Election
sakal
नाशिक: राज्यात प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील अकरा पालिकांसाठी येत्या मंगळवारी (ता. २) मतदान होत असून, बुधवारी (ता. ३) निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर आणि जिल्हा पोलिस दलाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.