Nashik Municipal Elections : नाशिक पालिका निवडणूक: आज 'चिन्ह' ठरणार, अपक्षांची धाकधूक वाढली!
Overview of Nashik Municipal Elections 2025 : नाशिक जिल्ह्यातील अकरा नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांना आज निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे. मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यासाठी उमेदवारांची लगबग वाढणार आहे.
नाशिक: जिल्ह्यातील अकरा पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत रंग भरायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीतील उमेदवारांना बुधवारी (ता. २६) चिन्हवाटप केले जाईल. अपक्ष उमेदवारांचे लक्ष आता चिन्हाकडे लागून राहिले आहे.