Municipal Elections
sakal
नाशिक: अंतिम मुदत जवळ आलेली असताना, जिल्ह्यात पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्जांचा पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. १५) दिवसभरात नगराध्यक्षपदासाठी १८, तर सदस्यपदासाठी तब्बल ३२४ अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या अनुक्रमे २८ आणि ४२५ झाली आहे.