नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना अंतिम टप्प्यात आली असताना नगरविकास विभागाने प्रारूप प्रभागररचनेवरील हरकती व सूचनांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविली आहे. शासकीय सुट्ट्यांमुळे हरकती व सूचनांसाठी केवळ तीनच दिवस उपलब्ध होत असल्याने सुधारित कार्यक्रम जारी करण्यात आल्याचे कारण देण्यात आले आहे.