Municipal Election
sakal
नाशिक: जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोमवारी (ता.१७) अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी झुंबड उडाली. इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करून नामनिर्देशन पत्र दाखल केले. शेवटची हाती आलेल्या माहितीनुसार नगराध्यक्षपदासाठी ११३ तसेच नगरसेवकपदांसाठी दिवसभरात ९५३ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले. दरम्यान, मंगळवारी (ता. १८) दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे.