Election
sakal
नाशिक: जिल्ह्यातील तीन पालिकांमधील सात प्रभागांच्या निवडणुकीत बुधवारी (ता.१०) अर्ज माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत आठ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे सात प्रभागांत आता २२ उमेदवार रिंगणात आहेत. सिन्नरच्या प्रभाग क्रमांक ५ ‘अ’मध्ये एकच उमेदवार शिल्लक असल्याने त्याच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. उर्वरित सहाही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान पार पडणार आहे.