Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: अडीच वर्षांपूर्वी पूर्व विभाग व सिडको विभागात केरकचरा संकलन व वाहतूक कामासाठी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या मे. आर. ॲन्ड बी. इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीने कल्याण-डोंबिवली महापालिकेचे बनावट कागदपत्रे सादर केल्याने तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर त्याच ठेकेदार कंपनीला सफाईच्या ठेक्यात भाग घेण्यासाठी काळ्या यादीतून वगळण्यात आल्याने महापालिकेच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. यामुळे सफाईचा ठेका पुन्हा एकदा वादात सापडला आहे.