Nashik Road Repair
sakal
नाशिक: पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यावर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक रहदारी असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. खड्डे बुजविताना पूर्ण पॅच मारले जात आहे. लक्ष्मीपूजनापर्यंत रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.