नाशिक- महापालिकेत सर्वात मोठी संघटना असलेल्या नाशिक म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेना आता शिवसेनाप्रणीत राहणार नसून भाजप प्रणीत होणार आहे. कारण माजीमंत्री बबन घोलप यांनी स्थापन केलेली संघटना आता घोलपांच्या प्रवेशामुळे पूर्णपणे भाजपची झाल्याने पक्षाच्या दृष्टीने ही मोठी घडामोड मानली जात आहे.