Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: जिल्ह्यातील अकरा पालिकांमधील नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी (ता. ६) करण्यात आले. या सोडतीमध्ये ओझर, भगूर, इगतपुरी व सटाणा पालिकांमधील पदे महिलांसाठी राखीव झाली आहेत. नांदगाव, मनमाड व सिन्नर पालिका खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहेत. दरम्यान, नगराध्यक्षनंतर बुधवारी (ता. ८) सकाळी अकराला अकराही ठिकाणी प्रभागनिहाय आरक्षण प्रकिया राबविली जाणार आहे.